ऑ पाले दे आन्द ब्रसेल्स … या नावाच्या भारतीय (खाना असलेल्या) हॉटेलसमोर आम्ही २/३ मिनिटे उभे होतो. तो ब्रसेल्स मधला आमचा पहिलाच दिवस होता. इतर हॉटेलसारखे इथे बाहेर मेन्यु कार्ड लावले नव्हते. पण लंच बुफे चा रेट ३० युरो (आक्खे २१०० रुपये) असा होता. लंडन मध्ये याच्या निम्म्याहून कमी किमतीत बुफे मिळतो. आम्ही तोंड वाकडे करून पुढे चालू लागलो. दोन दिवस ब्रेड, सांडविच व केळयान्वर काढल्यावर तिसऱ्या दिवशी फक्त पार्सल आणण्यासाठी आम्ही पुन्हा "ऑ पाले दे आन्द" (म्हणजे भारतीय राजमहाल!) समोर जाऊन ठाकलो. ते हॉटेल दुपारी २ ते ६ बंद असते. तेव्हा ५ वाजले होते, म्हणून पुन्हा तासाभराने आत प्रवेशते झालो.
दरवाजा उघडून आत गेलो तेव्हा समोर एक शाही बैठक होती, बरीच पितळी तबके ठेवली होती. हा वेटिंग एरिया. आत झिरमिळ्याचे पडदे होते. राज कपूरच्या सिनेमाचे एक पोस्टर बाहेर लावले होते. भिंतीवर सतार,नगारा अशी वाद्ये लावली होती एकंदरीत सगळा थाट व सजावट हैद्राबादी निजामाच्या दरबारात असल्यासारखी. भोजनकक्षाबाहेर जय-विजय सारखे दोन पुतळे होते - निजामाचे गुलाम. पडद्यांच्या आत बरीचशी टेबले सजवून ठेवली होती. त्यावर उंची मद्ये पिण्यासाठी ग्लासेस. बराचसा अंधार होता. प्रकाशाची सारी जबाबदारी काही मेणबत्यान्वर!!
डाव्या हाताला कौंटरच्या मागे एक गोरी शिष्ट बेल्जिअन बाई बसली होती. तिला मी नम्रपणे "इंग्लिश येते का ?" असे विचारले. माझ्याकडे बघूनच बाईने हे लो-बजेटवाले आहेत हे ओळखले होते, त्यामुळे ती जमेल तेवढा तुच्छपणा दाखवीत होती. मी टेक -अवे (पार्सल)ची विचारणा करून मेन्यु कार्ड बघू लागलो.
तेवढ्यात एक साधारण साठीचा फ्रेंच म्हातारा कोट / मफलर घालून आत आला. हि बाई सारखी फोन वरच बोलत होती. बहुधा पार्सल ऑर्डर / बुकिंग घेत असावी. म्हाताऱ्याला बघून तिने फोन खाली ठेवला. त्याने तिच्या दोन्ही गालांवर चुंबन घेतले. हे मलापण आधी का सुचले नाही? पण मागे अमिता बसली होती. म्हातारा हॉटेलचा मालक असावा असे वाटले. मोठा टेचात होता. आपल्याला बेल्जिअन रीतीरिवाज माहित नसल्याने मीही आपले गाल पुढे केले. पण तो तसाच पुढे निघून गेला माझ्या अंगावरून. मागे अमिता बसली असल्याने त्या दिशेने गेला नाही ना याची मी खात्री करून घेतली.
म्हातारा जय-विजयच्या मधून भोजनकक्षाकडे निघून गेला. मी त्याकडे पाहत असतानाच बाईने ऑर्डरची विचारणा केली. तिथे "व्हेज बिर्याणी - १४ युरो" एव्हढा एकच पदार्थ आम्हाला घेण्यासारखा होता. मी तो ऑर्डर केला. दिवसभराच्या ब्रसेल्स भ्रमंतीमुळे आम्हा दोघांचे डोके दुखत होते. म्हणून चार दिवस न मिळालेल्या चहाची विचारणा करण्याचे धाडस केले. कारण मेन्यु कार्ड मध्ये काहीच नव्हते. पण चहा होता, ३ युरोला होता. मी एकाच ऑर्डर केला. आम्ही बाहेरच तबकांजवळ बसलो. टेबलवर बसण्याची विनंती झाली नाही. कुहु ग्लास फोडेल म्हणून मीही विचारले नाही. मला वाटले चहा पार्सल देतात कि काय.
कुहु तबकांवर ठाण ठाण हात मारीत होती. ते तबक कुठल्याशा निजामाचे हात लागून पावन झाले होते. ओरखडे आले असते तर - जयविजय पैकी एकाला रिटायर करून मला तिथे उभे केले असते. मी या विचारात असतानाच तो म्हातारा आतून आला. त्याच्या हातात ट्रे होता. त्याने त्यातील किटली व कप तबकात ठेवला. म्हणजे हा मालक नसून वेटर होता तर. वेटर असून चुंबन घेत होता म्हणजे मालक असता तर….
… हा विचार पूर्ण होण्याआधीच "चा …चा … " असा कुहुचा चहात्कार ऐकू आला. मी किटलीताला चहा कपात ओतला. अमिता, कुहूस थोडा दिला. त्यातील बिस्कीट कुहूस दिले. त्या किटलीमध्ये चहाचा आक्खा खडा मसाला घातला होता (दालचिनी, वेलदोडे इ.) चहा दुधट पण बरा होता. जवळ जवळ तीन कप निघाला त्या कीटलीमधून. म्हातारा चांगला माणूस निघाला. त्याने कुहूस लॉलीपॉप दिला. आम्ही चहा घेत असताना एक चीनी (दिसणारी) मुलगी व तिचा फ्रेंच (दिसणारा) बॉयफ्रेंड आते आले आणि भीत-भीतच आम्हाला "बोन्जूर" म्हणून आत गेले. म्हातारा बाकीच्या मेणबत्त्या लावण्यासाठी निघून गेला.
आम्ही चहा संपवला. ती बाई एप्रन घालून आमची बिर्याणी घेऊन आली. म्हणजे हीही वेट्रेस होती तर. म्हणजे म्हाताऱ्याचे आणि हिचे काही? … असा चावट विचार मनात आला तेव्हा जय-विजय दोघेही माझ्याकडे अधीरतेने बघत होते. त्या बाईच्या चेहऱ्यावर "आता निघा" असेच भाव होते. मी कुहूचे बूट घालेपर्यन्त देखील तिथे थांबलो नाही. बाहेर आलो. अमिता मला ओरडतच बाहेर पडली. ऑ पाले दे आन्द नावाच्या त्या हॉटेलपासून आम्ही दूर चालू लागलो ते पुन्हा कधीच न येण्यासाठी.…
…. जय-विजय मात्र आपली रिप्लेसमेंट कधी मिळतेय या विचारात आजूनही तिथे उभे असतील. प्रत्येक गिऱ्हाईकाकडे कुतूहलाने पाहत असतील. म्हातारा रोज नेमाने ब्रसेल्स मधील रस्त्यांवरून खडखडत जाणाऱ्या ट्राम मध्ये बसून ठीकसंध्याकाळी ६ वाजता तेथे येत असेल. बाईचे चुंबन घेत असेल. मेणबत्त्या लावीत असेल. बाई भारतीय सोडून सर्वांना "बोन्जूर" म्हणत असेल. एप्रन घालून म्हाताऱ्याबरोबर पदार्थ सर्व्ह करीत असेल. तिथल्या पोस्टरमधल्या राजकपूरचे डोळेही भारतीय माणूस दिसल्यावर विस्फारत असतील. तिथली तबके थरथरत असतील, वाद्ये झंकारत असतील. रात्र झाल्यावर, नशेतले बेल्जिअन पुन्हा घरी गेल्यावर ती बाई कोट घालून गल्ला मोजत असेल. पोस्टरमधील नर्गिसच्या डोळ्यात आलेल्या अश्रुंवर म्हातारा फडके मारीत असेल. आणि त्यानंतर यांत्रिकपणे त्या खडखंडात करणाऱ्या ट्राम मध्ये बसून ते दोघे आपापल्या घरी जात असतील…

अमिता, कुहु, जय-विजय आणि ऑ पाले दे आन्द |