त्यांच्या निधनानंतर बरोबर दोन दिवसांनी सत्यसाई बाबा माझ्या स्वप्नात आले. आपला पुढील अवतार हा कुठल्या आंडू-पांडू तेलगु गावात नसून चक्क पुण्यात जन्माला येणार आहे आणि तो माझ्यापोटी येणार आहे असे ते म्हणाले. मी सर्व बोटे तोंडात घालून (स्वप्नात) उभा होतो. ते पुढे असेही म्हणाले, की मुलाचे नाव “प्रेम साई” असे ठेव. मी म्हंटले पण मुलगी झाली तर काय करू? त्यावर त्यांचे उत्तर तयार होते. “तू मराठी आहेस तेव्हा नुसतेच ‘प्रेमा’ अथवा ‘सई’ एवढे एकच ठेव, चालेल!”. स्वप्नात ते मराठी कसे काय बोलले हे मला कळले नाही. परंतु ते सर्वज्ञानी असल्याने त्यांना मराठी शिकायची काय गरज? कदाचित त्यांना सारखेच आंडू-पांडू बोलायचा कंटाळा आला असावा. ते तर ९६व्या वर्षी “वारणार” होते मग इतक्या लौकर कसे काय गेले हे मी विचारताच काहीही न बोलता त्यांनी हवेत हात फिरवून माझ्या हातात राख दिली. तसेच डोक्यावरचा एक केसही उपटून माझ्या हातात ठेवला आणि मूकपणे ते अंतर्धान पावले. त्यावेळी नेमकी सोन्याची अंगठी हवेतून कशी काय निघाली नाही याचे मला वाईट वाटले, गेला बाजार चांदीची तरी. पण ती स्वप्नातील राख असल्याने मी जास्त दुःख करीत बसलो नाही.
खरे सांगायचे तर मी स्वतः साई बाबांचा अवतार आहे हे मला लहानपणीच वयाच्या १० व्या वर्षी लक्षात आले होते. हे मी जाहीर करणार इतक्यात मला साई बाबांचा एक अवतार आधीच या जगात अस्तित्वात असल्याचे कळले. मग मी तो बेत रद्द केला. माझे अवतारपण लोकांना कळले नाही तरी आता माझ्या पोटच्या गोळ्यामध्ये ते आपसूक येणार आहे हे कळून मला जो आनंद झाला तो मी वर्णन करू शकत नाही! स्वप्नातून जागे झाल्यावर मी माझ्या बायकोस खडबडून उठवले. एवढ्या पहाटे काय ही कटकट म्हणून ती चिडूनच उठली. ही गोष्ट मी बायकोस सांगितली आणि तिची झोपही पळाली. माझ्या हातातील राख आणि केस बघून मात्र तिची खात्री पटली. तिला खूप आनंद झाला. बाळाचे पाय आम्हाला पाळण्यात नव्हे स्वप्नातच दिसले होते. आता बाळाच्या जडण घडणीची, पुढील आयुष्याची काळजी मिटली. होना, एका अवताराची आपण काय काळजी करणार? ते बाळ स्वयंभू होते, शिवाय १०व्या वर्षी ते स्वतःच “आपण साई अवतार असल्याचे” डीक्लेअर करणार होते. यानंतर भक्तगण काय ते बघून घेणार होते. बरं, हे भक्तगण पुण्याचे असले म्हणजे जरा खवचट असतील तेव्हा आम्ही बाहेर जाऊन त्यास गुंटकल जवळील “पुठ्ठामारती” नावाच्या गावात वाढवावे असाही एक अनाहूत सल्ला मिळाला. आम्हीं आनंदाने बाळजन्माची वाट पाहू लागलो. ती राख आणि केस आम्ही देव्हाऱ्यात ठेवला.
...आणि एके दिवशी सुमुहूर्तावर आमच्या घरी त्या अवतारी रुपाने जन्म घेतला. आम्हाला मुलगी झाली होती. मुलगी “बाबा-अवतार” होऊ शकते का हा प्रश्न मी स्वप्नातच मिटवला होता. त्या मुलीला दोन नावे ठेवली. प्रेमा आणि सई! प्रेमा आता आमच्या घरात वाढू लागली. तिच्या अवतारी रुपाची प्रचीती ती आम्हाला तिच्या चीमखड्या बोलातून करून देऊ लागली. तिची आई तिला प्रेमा म्हणत असे आणि मी सई. मी पूजेला बसलो असता तिथे येऊन ती ध्यान करत बसे. आम्हाला तर तिच्यात साक्षात बाबा दिसत असत. गाड्या, बाहुल्या, भातुकली या खेळात तर तिला रसच न्हवता. त्या ऐवजी ती साईंचे चरित्र घेऊन बसत असे. वेळ मिळेल तेव्हा (आमचे ध्यान) ध्यान करीत बसलेली दिसे. वयाच्या तिसऱ्या वर्षीच तिला गीतेचे दोन अध्याय पाठ होते. शाळेतील सर्व पाठ्य-पुस्तके रद्द करून बाबा-चरित्र, सथ्य साई भाषणे, साई वंदना, प्रशांती निलायम (अरेरे..इत्यादी) ही पुस्तके लावावीत असे तिने शाळेत सुचविले. तिला शाळेतील शिक्षकांनी (आणि काही टारगट पोरांनी) मुर्खात काढले. योग्य वेळ येताच त्यांना त्यांची चूक कळेल म्हणून आम्ही गप्प बसलो. शेवटी या जगात थोर महात्म्यांना कष्टातच दिवस काढावे लागतात. त्याला आपण सामान्य माणसे काय करणार?
सई अवतारी स्त्री आहे हे गुपित आम्ही कुणाला सांगितले नव्हते. एक गोष्ट आमच्या लक्षात आली की, केसांच्या बाबतीत सई बापाच्या वळणावर जाऊ लागली. तिच्या डोक्यावर फारसे केसच उगवेनात. मग तिचे केस कुरळे करण्यासाठी आम्ही एका डॉक्टरला भेटलो. केस प्रत्यारोपणाची प्रक्रिया करून सईच्या डोक्यावर कुरळे केस येऊ लागले. आम्ही हरखून गेलो. ज्यांना तिच्या अवताराची कल्पना नव्हती ते लोक आमची चेष्टा करायला लागले. पण शेवटी ते सामान्य लोकच, त्यांना काय कळणार हिऱ्याची पारख. काही लोक तर “अवतार” हा शब्द तिच्या केसांकडे बोट दाखवून कुचेष्टेने वापरायला लागले. आम्हाला संताप येत असे. पण थोर लोकांचे बालपण असेच वाळीत टाकल्यासारखे असल्याने, त्यांच्या आई-बापांचाही इलाज नसतो.
सहाव्या वर्षानंतर आलेल्या मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही तिला जादूगार परमवीर यांचेकडे काही जादू शिकावयास पाठविले. त्यातही आम्ही हवेतून वस्तू काढून दाखवण्याच्या जादूवर जास्ती लक्ष घालायला सांगितले. प्रेमाचा ओढा पत्त्यांच्या जादुकडे जायला लागला तेव्हा आम्हाला पत्ते लपवून ठेवावे लागले. पत्त्यातून फुले काढणे, रुमालातून चेंडू ठेऊन कबुतर काढणे कींवा माणूस अर्धा कापून पुन्हा जोडणे असल्या जादूचा तिला उपयोग नव्हता. हवेतून वस्तू काढणे यातच मास्टरी मिळव असे आम्ही तिला परोपरीने विनवीत होतो. ती अजिबात ऐकेना, तेव्हा मी एकदा तिला रागाच्या भरात गालावर हलकेच चापटी मारली. प्रेमा ढसाढसा रडायला लागली. मी हळूच मारले होते, पण तिची आई माझ्यावर ओरडली. मला पश्चात्ताप झाला. स्वामी मी हे काय केले, भक्तावर दया कर म्हणून मी देवासमोर बसलो. देव्हाऱ्यातील बाबांच्या केसाला हात लावून प्रतिज्ञा केली की आता प्रेमाच्या केसालाही धक्का लावणार नाही! (तसेही तिचे केस कृत्रिम आहेत, काहीही करा असे आमचा एक शेजारी खवचटपणे म्हणाला तेव्हा त्याच्या केसांना वाचविण्यासाठी मला खूप संयम बाळगावा लागला!).
प्रेमा वा सई आता जादुमध्ये तरबेज झाली होती. कुचक्या पुणेरी लोकांपासून दूर ठेवावे म्हणून आणि सत्संग लाभावा म्हणून आम्ही तिला आंध्रमध्ये “पुठ्ठामारती” गावात घेऊन गेलो. तिथे तेलुगु मीडीअम असलेने शाळेत घालता आले नाही. तसेच तिथे तिच्यासारखेच केस असलेली आणि भगवे कपडे घातलेली बरीच शाळकरी पोरे दिसल्याने आम्ही तिला परत घेऊन आलो. शेवटी या जगात सगळा बहिरुप्यान्चाच भरणा! खरा अवतारी पुरुष (स्त्री) कुणाला समजणार? आमच्या राजहंसाला त्या बदकांच्यात ठेवणे अगदी जीवावर आले. आम्ही उलट पावली पुण्यात परतलो.
सई आठ वर्षांची झाली, तिला गीतेचे ४ अध्याय पाठ येऊ लागले. पण आता पुढील अध्याय पाठ करायला ती टाळाटाळ करू लागली. आम्ही तिला एका गुरुबाबांकडे घेऊन गेलो. तिथे बसून ती संस्कृत श्लोक, गीता, वेद सगळे जाणून घेईल म्हणून. सई तेही मुखोद्गत करू लागली. सर्व ज्ञानी, विद्वान लोकांप्रमाणे सईला भगवा रंग खूप आवडत असे. जन्मजात विरक्तच लोक हे! ही विरक्ती तिच्याही अंगात भरली होती असे आम्हास वाटे. तिला जास्तीत जास्त भगवे कपडेच आम्ही आणून देत असू. तिचा टूथब्रश, कंगवा झालच तर दप्तरही भगवे होते. पण एके दिवशी तिच्या मैत्रिणींचे पाहून ती जेव्हा भगवी जीन्स आणि स्कर्ट मागायला लागली तेव्हा मात्र कमालच झाली. आम्ही साफ नकार दिला. थोडीशी रडली, यावेळी आम्ही तिची कशीबशी समजूत काढली. इंग्रजीत “चाईल्ड इज दी फादर ऑफ द मॅन” अशी म्हण आहे, आता “फादर इज दी चाईल्ड ऑफ द (अवतारी) डॉटर” अशी एक नवीन म्हण पडेल.
प्रेमा आता दहा वर्षांची झाली, आपल्या खऱ्या स्वरूपाबद्दल तिने अजून एक अक्षरही काढले नव्हते. आम्हाला थोडी काळजी वाटली, पण योग्य वेळ येताच बाबा आपले रूप दाखवतील ही खात्री होती. प्रेमाला आम्ही जुने भक्तीरसपूर्ण संतांचे चित्रपटच दाखवीत असू. एकदा ती आम्हाला ना सांगता मैत्रिणींबरोबर “मेरा दील मैने फेका, क्या तुने समेटा
” अशा नावाचा सिनेमा बघून आली. हा काहीतरी नवीन अध्यात्माचा प्रकार असावा म्हणून आम्ही तिकडे दुर्लक्ष केले.
प्रेमासईला बारावे लागले तेव्हा मात्र आम्ही खूपच काळजीत पडलो. ती आपला अवतार जगासमोर कधी डिक्लेअर करेल हेच कळत नव्हते. आम्हीच मग तिला विश्वासात घेऊन तिच्या मागील जन्माबद्दल आणि कार्याबद्दल सांगितले. तिला आश्चर्य वाटले. ही काहीतरी बाबांचीच इच्छा असावी कींवा ती ढोंग करत असावी कींवा योग्य वेळ आली नसावी बहुधा. मग आम्हीच हिय्या करून एक कार्यालय बुक केले. तिथे सर्व नातेवाईक, शेजारी आणि मित्र-मंडळीस (व काही पत्रकारांस) बोलाविले. प्रेमासईला भगवे वस्त्र घालून, तिच्या कुरळ्या केशसम्भारासकट घेऊन गेलो. तिथे तिने गीतेचे ५ अध्याय आणि काही श्लोक म्हणून दाखवले. शिवाय परमवीरांनी शिकवलेल्या जादूने हवेतून राख व सोन्याच्या साखळ्या काढून दाखवल्या. ह्या साखळ्या मुलामा दिलेल्या सोन्याच्या आहेत हे काही (खवट) पुणेकरांनी ओळखलेच. तिच्या जादूचे मात्र कौतुक झाले. हे झाल्यावर आम्ही आमची सर्व कथा-कथन केली (अगदी स्वप्नातील साक्षात्कारापासून) आणि प्रेमासई हेच कसे बाबांचे रूप आहे हे वर्णन केले.
या गोष्टीची कुणकुण लागलेला एक पत्रकार २/३ दिवसांपूर्वीचा एक पेपर घेऊन आला होता. लोकांना दुसऱ्याचे सुख बघवत नाही हेच खरे, त्यातल्या त्यात पत्रकारांना जास्त! त्या पेपरात बातमी होती “पुठ्ठामारती येथे साई अवताराचा साक्षात्कार! १० वर्षांच्या मुलात दिसल्या साईंच्या खुणा”. हा कोण भोंदू मुलगा आज साईंचा पुनर्जन्म म्हणून मिरवत होता. सगळीकडे त्याचा उदो-उदो झालेला दिसत होता. नशिबाने पुन्हा फासे माझ्यावर उलटवले होते. शेवटी या जगात असली पेक्षा नकलीचीच चलती जास्त!

खोट्या सोन्याच्या साखळ्या घेऊन पुणेकर घरोघरी निघून गेले. आम्ही कार्यालयाचे भाडे देऊन खिन्न मनाने घरी आलो. बायको म्हणाली आता तरी तिला थोडे माणसा-सारखे जगू देऊ. तिने सईची भगवी वस्त्रे काढून तिला छानसा फ्रॉक घातला. मी देव्हाऱ्यातील राख आणि केस कचराकुंडीत टाकून दिले. सईच्या पाठीत एक धपाटा घालून तिला मिठी मारली....तिच्यासाठी दुसरे करीअर शोधण्याची मोठ्ठी जबाबदारी आता मला पार पडायची होती!
अहो असे निराश होऊ नका. तुमच्या नावातच गॉड बोले आहे. विष्णूचे दशावतार झाले तर साईंचे २ concurrent अवतार का होऊ शकत नाहीत? तुमच्या अवतारी अपत्याला एकदा ऑन साईट घेऊन जा. आणि तिथून प्रसिद्धी ऑपरेशन सुरु करा. ऑन साईट वरून मला अचानक एक नवीन नाव सुचले. ते एकदा देऊन बघा. "ऑन साई".
ReplyDelete"प्रेमा ऑन साई गॉड बोले". नावातच सर्व काही आहे.
सर्व घटना काल्पनिक असून त्यांचा वास्तवातल्या कोणत्याही घटनेशी अथवा व्यक्तीशी संबंध नाही!
ReplyDeleteवरील लेखाशी स्वत: लेखक/ संपादक/ ब्लॉगर/ वाचक मंडळी सहमत असतीलच असे नाही.
माझ्या मते ही दोनीही वाक्य लिहून टाक शेवटी...!! :)
You're getting very creative ideas Rohit :)
ReplyDeleteAmhi chaangli naave suchvaayla madat karu baraka, tyaasathi itke kaahi creative vhaychi garaj nahiye :)
परम पुज्य अवतारपीता, तुमच्या कल्पना शक्तीची आणि त्याहून जास्त ती शब्दरुपाने आपल्या लेखात तितक्याच प्रभावीपणे उतरवण्याची दाद दिली पाहिजे. मस्त लिहिले आहे. हर्षदने दिलेल्या सल्याचा जरूर विचार करावा आणि खरोखर आपल्या आपल्या अपत्याचा अवतार केलात तर सोने/चांदीच्या रूपाने आमच्यावर आशीर्वाद असावा. :)
ReplyDeleteToo Good Rohit Too Good!!!!!!
ReplyDeleteKeep it up and think seriously over what i has said earlier
Thank you all!
ReplyDeleteTumachya sarvanchya suggestions cha vichar kela jaal :-)
~Rohit
Abhinandan, suputri prapti zaalich tar. Pahile paul padle Prema-Sai chya kathetil. Anek uttam aashirwaad!
ReplyDelete- Ruhi cha baba
>>मेरा दील मैने फेका, क्या तुने समेटा पुलंची वाक्य नका टाकू त्यांची फार छाप जाणवते. लेख मस्त आहे.
ReplyDeleteछान लिहिले आहे!!
ReplyDelete