५ सप्टेम्बर, २००५ ची न्यूयॉर्क मधली पहाट. सकाळी ४:३० वाजता तेथील गल्ल्यांमधून आम्ही जे. ऍफ़. के शोधत फिरत होतो. दोन दिवसापूर्वी रेंट केलेल्या SUV मधून न्यूयॉर्क - नायगारा - न्यूयॉर्क असा प्रवास करून अगदी थकून गेलो होतो. मी आणि अजित मागच्या सीटवर ब्यागा सांभाळत पेंगत बसलो होतो. नुपूर आणि चेतन पुढील सीट्स वरून आम्हाला एअरपोर्टवर सोडण्याची जबाबदारी पार पाडत होते. चेतन ड्रायव्हर आणि नुपूर न्याव्हीगेटर!
सकाळी ६ ला सुटणारे डेन्व्हर - सिनसिन्याटी विमान आम्हाला पकडायचे होते. आणि आता आम्हाला अंधारात एअरपोर्टचा रस्ताच सापडत न्हवता. झोपेतून जागे होऊन पाहतो तो चेतन कुठल्या तरी पेट्रोल पंपावर चौकशी करीत असायचा. असे बहुतेक ३/४ दा झाले. पण कुणालाही जे. ऍफ़. के चा पत्ता सांगता आला नाही. हे म्हणजे आग्र्यामध्ये ताजमहाल माहित नसण्यासारखे झाले! ५ वाजत आले, फ्लाईट ची वेळ जवळ आली पण एअरपोर्टचा पत्ता न्हवता.
शेवटी काय चमत्कार झाला माहित नाही, पण एकदाचा तो दिसायला लागला. आमचा जीव भांड्यात पडला. चेतन आणि नुपूर आम्हाला सोडून पुन्हा मार्गस्थ झाले. आम्ही पळत पळत आत जाऊन इ-चेक इन केले. ५:२० झाले होते, पुन्हा धावत आमच्या गेटवर पोहोचलो. तिथे पाहतो तो काय विमान अर्धा तास लेट होते. डेल्टाचा पायलटच आजारी पडला होता. मग आम्हाला दुसऱ्या एका विमानाने अटलांटा वरून जायचा ऑप्शन दिला गेला. थोडे हताश होऊन वाट पाहिल्यावर दुसरा पायलट मिळाला त्यांना! आमचे बोर्डिंग चालू झाले. आता गेटामधून आत जाऊन बोर्डिंग पाइंटवर आलो आणि पाहतो तो काय तिथे विमानच न्हवते....
पुढे एक जीना होता. तिथून खाली पहिले तेव्हा ते डेल्टा चे २५/३० सीटर छोटे विमान दिसले. खाली आलो. अजित च्या हातात आमची छोटी ब्याग होती. ती नेहेमीच्या विमानात क्याबीन लगेज म्हणून चालते. पण इथे आम्हाला ती चेक-इन करावी लागली. विमानाच्या मागच्या डिकी मध्ये ती ब्याग टाकून आम्हाला रीतसर रिसीट दिली गेली. जिना चढून विमानात स्थानापन्न झालो. आता लक्षात आले कि तिकडे जास्त कोणी एअरहोस्ट वा होस्टेस न्हवते. एकच काळा माणूस लोकांना ब्यागा ठेवायला मदत करीत होता. तो आणि पायलट एवढे दोनच कर्मचारी डेल्टा तर्फे विमानात हजर होते. आम्ही अवाक झालो! त्या काळ्या माणसाला काही जमत न्हवते म्हणून शेवटी चिडून पायलटच बाहेर आला. त्याने स्वतः लोकांच्या ब्यागा लावल्या. मी आणि अजितने हे दृश्य कधीही पाहिले न्हवते. आम्ही सीट बेल्ट लावले, काळा माणूस कॉकपिटच्या मागे एका फळीवर आमच्याकडे तोंड करून बसला. या प्रवासात आम्हाला खायला सोडा, साधे पाणी पण मिळाले नाही.
विमान म्हणजे एक उडणारी एसटी बसच वाटत होती. छोट्या विमानावर तेवढा कॉन्फिडन्स येत नाही मात्र :-) न्यूयोर्कहून सिनसिन्याटीला जायला जवळपास दीड तास लागतो. ८ ला सुटलेले विमान ९:३० ला तिथे पोहोचले. सिनसिन्याटी हे ओहायो नावाच्या राज्यात आहे. आम्ही भराभरा उतरलो. एअरपोर्टवरील बसमधून दुसऱ्या गेटवर गेलो. जरा घसा गरम करावा म्हणून कॉफी घेतली, तेवढ्यात पुढच्या विमानाची वेळ झाली. डेन्व्हरला जाणारे डेल्टाचे विमान. हे जरा मोट्ठे होते. कॉफी तशीच कचऱ्यात टाकून आम्ही बोर्डिंग केले.
शेवटी एकदाचे डेन्व्हरला पोहोचलो. तेव्हा तिथे १० वाजले होते आणि न्यूयोर्क ला १२! पटकन पार्किंग मध्ये आलो आणि आमची कार घेऊन गोल्देन कडे सुसाट सुटलो. पार्किंग चे ३ दिवसाचे ७०$ भरले! हेच आम्ही न्यूयोर्क मध्ये ८ तासांचे भरले होते :-).
३ दिवसांच्या सफरी नंतर आता लगेच ऑफिस गाठायचे होते ....

खुप मजा आली होती रे तेव्हा !
ReplyDeleteचेतन (शास्त्री) आपला प्रत्येक गल्ली बोळातून अशी काय गाडी चालवत होता कि जसे सांगलीच्या सहा गल्लीपैकी एखाद्यातून चालवेल ... आणि जिथेही पत्ता विचारावा तिथे असे वाटत होते कि हाच त्यांना airport चा पत्ता सांगतोय !
ते छोटेखानी विमान उडायला लागल्यावर तर एखादी छोटी बसच उडते आहे असे वाटत होते...बहुदा "private जेट" असेच उडत असेल..