चंद्रावर पाणी सापडल्याचे ऐकून चंद्राचे मनोगत सांगणारी एक कविता सुचली ...
पाणी न्हवेच ते! मज वाटे अश्रू - चंद्राचे असती !
चंद्र म्हणे धन्य मानवा असे तुझी प्रगती.
घिरट्या घाली मी पृथ्वी भवती लक्ष लक्ष वर्षे.
थक्क करी तुझी वाटचाल, पाहिली मी हर्षे.
नाही दुसरे कोणी, या विश्वात असे माझी एक पृथ्वी माय.
वसुन्धरेने दिधले जीवन,तिचे फेडशील पांग काय?
रुसला पाऊस, झाडे पडली, अन् तप्त जाहली धरती।
कितीक करसी अत्याचार ते, तुज होईल कारे उपरती?
नयन तुझे माझ्यावरती आता, भय हे मजला वाटे.
तुझ्या लुटीला रान मोकळे, नाहीच कसले काटे.
एकच आर्जव करतो आता, जा परत फिर मनुजा.
या चंद्राला राहूदेत कि, फक्त कल्पनेत कविच्या !
Wednesday, 30 September 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
Chan Kavita ahe re. Ani blog vishayi shubheccha..
ReplyDeleteKavita Premi (APB)