रस्त्यावरून जाताना अवचित एक जुना मित्र भेटतो. तो अजूनही तसाच आहे, धडाडीचा - पण फारसे यश न मिळालेला. मी यशस्वी. माझ्या खिशात हजार रुपये खुळखुळत असतात, त्याच्या खिशात असते एकच दहाची नोट. गप्पा मारत आम्ही एका टपरीवर पोहोचतो. काय घ्यावे याचा दोनतीनदा विचार करून मी पाच रुपयाचा वडापाव घेतो, दहा रुपयांचा इडली सांबार सोडून. तो मात्र इडली सांबारच घेतो. दहाची नोट उडवून टाकतो. खाता खाता मला सांगतो कि, आता थोडा पगार वाढला तर तो नायकेचे बूट घेणार आहे आणि दोन वर्षात एखादी रेसिंग बाईक! त्याच्या खिशात आता शून्य रुपये आहेत आणि माझ्या खिशात नऊशे पंचाण्णव!
खरा दरिद्री कोण? खिशात शून्य रुपये असताना मोठ्ठ्या स्वप्नांचे इमले बांधणारा तो माझा मित्र कि हजार रुपये असताना पाच रुपये वाचविण्यासाठी विचारांची कुरतड करत वडापाव खाणारा मी? माझ्या वृत्तीवर चार शिव्या हासडून तो चालू लागतो, त्याच्या स्वप्नांचे कौतुक करावे कि काय या विचारात मी शब्द गिळतो.....
Monday, 11 January 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
खरे दरीद्री कोन?... तुम्ही
ReplyDeleteआंन मीही त्यातलाच आहे...
पैसा वाढविन्याच्या नादात चिताग्रस्थ झालेलो आम्ही खरेच दरिद्री आहोत... हे कळते आहे तरी वळत नाही हे त्यावर दळीद्रीपणाचे लक्षण ...
asach ek prasang "ek unad divas" madhye khup chan dakhavala aahe. Ashok saraf ne manatil vicahr changale enact kelet. arthat tyachya nehemichya shailit.
ReplyDeletebaki post pramane he post pan chote ani chan
sundar mitraa, sundar!
ReplyDeletepahilyaanda vaachtoy tujha blog.
Carry on..
You got another devoted reader!
- Aniket
It needs lot of courage to write this...
ReplyDeleteWell Done ROHIT !!!